पुण्यातील तळेगाव दाभाडे मध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर हल्ला, हल्लेखोर ही अल्पवयीन, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद..
पुण्यातील तळेगाव दाभाडे मध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर हल्ला, हल्लेखोर ही अल्पवयीन, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद..
पुणे NexVartaप्रतिनिधीपुण्यातील तळेगाव दाभाडे येथे मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून 16 वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ‘King Is Back’ असे मोबाईल स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोर ही अल्पवयीन आहेत. तीन महिन्यांपूर्वी MIDC हद्दीत एका हत्येच्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपी सुधार गृहातून बाहेर आला. त्याच्या सोबत फोटो काढून king is back असा स्टेट्स ठेवला. या रागातून तीन महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या तरुणाच्या मित्रांनी हा हल्ला केला.ही घटना शिवाजी चौक परिसरातील एका कपड्याच्या दुकानात घडली, स्टेट्स ठेवणारा मुलगा या दुकानात कामाला होता. त्या दुकानात घुसून तीन जणांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. हल्ल्यात मुलगा जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तळेगाव पोलिसांनी दिली. त्यानंतर काही तासांत हल्लेखोर अल्पवयीन आणि ते ज्या गाडीतून पळाले त्याच्या चालकाला ही ताब्यात घेण्यात आलंय.

