BREAKING• पुणे वार्ता
रायफलची साफसफाई करताना चुकून गोळी सुटल्याने एकाचा मृत्यू.
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)
घरातील रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटली आणि ती त्यांच्या छातीला लागली.
लोणावळा,५ ऑक्टोबर, NVNews-लोणावळ्यात घरात रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अभय मराठे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरातील रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटली आणि ती त्यांच्या छातीला लागली. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रायफलमध्ये गोळी नेमकी कशी लोड होती आणि साफसफाईदरम्यान गोळी कोणत्या परिस्थितीत सुटली, याचा पोलीस तपास सुरू आहे. या घटनेची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे...
ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:

