२ ऑक्टोबर, २०२६|Pune: 28°C|Mumbai: 30°C
E-Paper|||
BREAKING
महाराष्ट्र-एसटीमध्ये पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड आवश्यक; कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या नोंदणीकृत प्रवाशांची वैध QR पावतीही ग्राह्य. •महाराष्ट्र -महाराष्ट्रात मालमत्तेसंबंधी ६३ प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आजपासून आधार पडताळणीची अट; आधार नसलेल्यांसाठी नोंदणीचा पुरावा आणि पर्यायी ओळखपत्रांची तरतूद.•देश -फटाक्यांवर पूर्ण बंदी किंवा दिवसभर वापराऐवजी ठरावीक वेळेचा पर्याय विचारात घेण्याची सर्वोच्च न्यायालयाची भूमिका; अंतिम वेळांबाबत निर्णय अद्याप प्रलंबित. •देश-- मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण पूर्ण झालेल्या राज्यांत ऑनलाइन ‘फॉर्म ६’मधील अतिरिक्त SIR घोषणा हटवली; पुनरीक्षण सुरू असलेल्या राज्यांत अट कायम.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे -मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यातील २ ऑक्टोबरचे आंदोलन तात्पुरते स्थगित; परीक्षा ऑफलाइन ठेवण्यासह भरतीबाबत आश्वासने.•पुणे - पुणे जिल्ह्यातील सर्व १२१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ‘मॉडेल पीएचसी’मध्ये रूपांतर करण्याचे नियोजन; ५५ केंद्रांचे रूपांतर पूर्ण, उर्वरित केंद्रांतील सुविधा सुधारण्यावर भर. •विज्ञान - फुलपाखरांच्या पंखांवरील नक्षी आणि हालचालींमुळे उड्डाणाच्या दिशा-वेगाबाबत दृष्टिभ्रम निर्माण होतात; भक्षकांना चकवण्याच्या संभाव्य युक्तीवर ‘नेचर’मध्ये नवे संशोधन. •विज्ञान -आफ्रिकेतील जंगल पुनर्स्थापनेच्या अभ्यासात नैसर्गिक पुनरुत्पादनामुळे प्रकल्पांसह आसपासच्या परिसरातही वृक्षहानी कमी; परिणाम देश आणि पुनर्स्थापनेच्या पद्धतीनुसार बदलत असल्याचा निष्कर्ष. •महाराष्ट्र-एसटीमध्ये पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड आवश्यक; कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या नोंदणीकृत प्रवाशांची वैध QR पावतीही ग्राह्य. •महाराष्ट्र -महाराष्ट्रात मालमत्तेसंबंधी ६३ प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आजपासून आधार पडताळणीची अट; आधार नसलेल्यांसाठी नोंदणीचा पुरावा आणि पर्यायी ओळखपत्रांची तरतूद.•देश -फटाक्यांवर पूर्ण बंदी किंवा दिवसभर वापराऐवजी ठरावीक वेळेचा पर्याय विचारात घेण्याची सर्वोच्च न्यायालयाची भूमिका; अंतिम वेळांबाबत निर्णय अद्याप प्रलंबित. •देश-- मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण पूर्ण झालेल्या राज्यांत ऑनलाइन ‘फॉर्म ६’मधील अतिरिक्त SIR घोषणा हटवली; पुनरीक्षण सुरू असलेल्या राज्यांत अट कायम.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे -मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यातील २ ऑक्टोबरचे आंदोलन तात्पुरते स्थगित; परीक्षा ऑफलाइन ठेवण्यासह भरतीबाबत आश्वासने.•पुणे - पुणे जिल्ह्यातील सर्व १२१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ‘मॉडेल पीएचसी’मध्ये रूपांतर करण्याचे नियोजन; ५५ केंद्रांचे रूपांतर पूर्ण, उर्वरित केंद्रांतील सुविधा सुधारण्यावर भर. •विज्ञान - फुलपाखरांच्या पंखांवरील नक्षी आणि हालचालींमुळे उड्डाणाच्या दिशा-वेगाबाबत दृष्टिभ्रम निर्माण होतात; भक्षकांना चकवण्याच्या संभाव्य युक्तीवर ‘नेचर’मध्ये नवे संशोधन. •विज्ञान -आफ्रिकेतील जंगल पुनर्स्थापनेच्या अभ्यासात नैसर्गिक पुनरुत्पादनामुळे प्रकल्पांसह आसपासच्या परिसरातही वृक्षहानी कमी; परिणाम देश आणि पुनर्स्थापनेच्या पद्धतीनुसार बदलत असल्याचा निष्कर्ष. •
मुख्य पान (Home)पुणे वार्तादहा दिवसांत पुणे जिल्ह्यात ६ हजारांहून अधिक आरोग्य शिबिरे
← सर्व बातम्या पहा
BREAKING• पुणे वार्ता

दहा दिवसांत पुणे जिल्ह्यात ६ हजारांहून अधिक आरोग्य शिबिरे

दहा दिवसांत पुणे जिल्ह्यात ६ हजारांहून अधिक आरोग्य शिबिरे
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.

पुणे, NVnews प्रतिनिधी, : गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात दहा दिवसांच्या कालावधीत ६५८६ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आणि त्यामध्ये ३,०१,८४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

"श्री गणेशा आरोग्याचा" उपक्रम हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख, महाराष्ट्र राज्य, श्री. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

आरोग्य शिबिर.
📷 आरोग्य शिबिर.

पुणे जिल्ह्यात या उपक्रमाचे प्रभावी नियोजन व समन्वय डॉ. मानसिंग साबळे यांनी केला. विविध शासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक गणेश मंडळे, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संस्थांमध्ये समन्वय साधत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

घराजवळच मिळाली आरोग्य तपासणीची सुविधा

पुणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भाग, नगरपालिका, नगरपंचायती तसेच विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे गणेशोत्सवासाठी बाहेर पडलेल्या भाविकांना त्यांच्या परिसरातच प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली.

या शिबिरांमध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, हृदयविकार, इसिजी तपासणी,रक्त तपासण्या, किडनीविकार, कर्करोग,दंतरोग, संसर्गजन्य आजार, फिजिओथेरपी उपचार, आयुर्वेद उपचार, आयुष्यमान कार्ड नोंदणी, अवयवदान नोंदणी,बालरोग तसेच इतर सर्व प्रकारचे आजार तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्यांची प्राथमिक तपासणी, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी करण्यात आली.

आरोग्य तपासणीदरम्यान समस्या आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर तसेच संबंधित शासकीय, निमशासकीय आणि धर्मादाय रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात आले. पात्र रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय योजना आणि इतर शासकीय आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रभावी नियोजनातून व्यापक जनसहभाग

पुणे जिल्ह्यातील उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, शासकीय व धर्मादाय रुग्णालये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग लाभला.

गणेशोत्सवासारख्या मोठ्या लोकसहभागाच्या उत्सवाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, आजारांचे प्राथमिक निदान आणि आरोग्य जनजागृती करण्याचा उपक्रमाचा उद्देश यशस्वीपणे साध्य करण्यात आला.

ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
दहा दिवसांत पुणे जिल्ह्यात ६ हजारांहून अधिक आरोग्य शिबिरे | NexVarta News