२ ऑक्टोबर, २०२६|Pune: 28°C|Mumbai: 30°C
E-Paper|||
BREAKING
महाराष्ट्र-एसटीमध्ये पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड आवश्यक; कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या नोंदणीकृत प्रवाशांची वैध QR पावतीही ग्राह्य. •महाराष्ट्र -महाराष्ट्रात मालमत्तेसंबंधी ६३ प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आजपासून आधार पडताळणीची अट; आधार नसलेल्यांसाठी नोंदणीचा पुरावा आणि पर्यायी ओळखपत्रांची तरतूद.•देश -फटाक्यांवर पूर्ण बंदी किंवा दिवसभर वापराऐवजी ठरावीक वेळेचा पर्याय विचारात घेण्याची सर्वोच्च न्यायालयाची भूमिका; अंतिम वेळांबाबत निर्णय अद्याप प्रलंबित. •देश-- मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण पूर्ण झालेल्या राज्यांत ऑनलाइन ‘फॉर्म ६’मधील अतिरिक्त SIR घोषणा हटवली; पुनरीक्षण सुरू असलेल्या राज्यांत अट कायम.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे -मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यातील २ ऑक्टोबरचे आंदोलन तात्पुरते स्थगित; परीक्षा ऑफलाइन ठेवण्यासह भरतीबाबत आश्वासने.•पुणे - पुणे जिल्ह्यातील सर्व १२१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ‘मॉडेल पीएचसी’मध्ये रूपांतर करण्याचे नियोजन; ५५ केंद्रांचे रूपांतर पूर्ण, उर्वरित केंद्रांतील सुविधा सुधारण्यावर भर. •विज्ञान - फुलपाखरांच्या पंखांवरील नक्षी आणि हालचालींमुळे उड्डाणाच्या दिशा-वेगाबाबत दृष्टिभ्रम निर्माण होतात; भक्षकांना चकवण्याच्या संभाव्य युक्तीवर ‘नेचर’मध्ये नवे संशोधन. •विज्ञान -आफ्रिकेतील जंगल पुनर्स्थापनेच्या अभ्यासात नैसर्गिक पुनरुत्पादनामुळे प्रकल्पांसह आसपासच्या परिसरातही वृक्षहानी कमी; परिणाम देश आणि पुनर्स्थापनेच्या पद्धतीनुसार बदलत असल्याचा निष्कर्ष. •महाराष्ट्र-एसटीमध्ये पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड आवश्यक; कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या नोंदणीकृत प्रवाशांची वैध QR पावतीही ग्राह्य. •महाराष्ट्र -महाराष्ट्रात मालमत्तेसंबंधी ६३ प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आजपासून आधार पडताळणीची अट; आधार नसलेल्यांसाठी नोंदणीचा पुरावा आणि पर्यायी ओळखपत्रांची तरतूद.•देश -फटाक्यांवर पूर्ण बंदी किंवा दिवसभर वापराऐवजी ठरावीक वेळेचा पर्याय विचारात घेण्याची सर्वोच्च न्यायालयाची भूमिका; अंतिम वेळांबाबत निर्णय अद्याप प्रलंबित. •देश-- मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण पूर्ण झालेल्या राज्यांत ऑनलाइन ‘फॉर्म ६’मधील अतिरिक्त SIR घोषणा हटवली; पुनरीक्षण सुरू असलेल्या राज्यांत अट कायम.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे -मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यातील २ ऑक्टोबरचे आंदोलन तात्पुरते स्थगित; परीक्षा ऑफलाइन ठेवण्यासह भरतीबाबत आश्वासने.•पुणे - पुणे जिल्ह्यातील सर्व १२१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ‘मॉडेल पीएचसी’मध्ये रूपांतर करण्याचे नियोजन; ५५ केंद्रांचे रूपांतर पूर्ण, उर्वरित केंद्रांतील सुविधा सुधारण्यावर भर. •विज्ञान - फुलपाखरांच्या पंखांवरील नक्षी आणि हालचालींमुळे उड्डाणाच्या दिशा-वेगाबाबत दृष्टिभ्रम निर्माण होतात; भक्षकांना चकवण्याच्या संभाव्य युक्तीवर ‘नेचर’मध्ये नवे संशोधन. •विज्ञान -आफ्रिकेतील जंगल पुनर्स्थापनेच्या अभ्यासात नैसर्गिक पुनरुत्पादनामुळे प्रकल्पांसह आसपासच्या परिसरातही वृक्षहानी कमी; परिणाम देश आणि पुनर्स्थापनेच्या पद्धतीनुसार बदलत असल्याचा निष्कर्ष. •
मुख्य पान (Home)पुणे वार्तामहाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक
← सर्व बातम्या पहा
ELECTION• पुणे वार्ता

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)

व्यापक स्वरुपात मतदार जनजागृती करा- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

पुणे, दि. ३०,NVnews : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही आणि सर्व मतदारांना मतदानाचा हक्क नियमानुसार बजावता यावा, याकरिता विविध माध्यमांद्वारे व्यापक स्वरुपात मतदार जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह समन्वय अधिकारी आणि दूरदृष्यप्रणालीद्वारे निवडणुकीशी संबंधित पाचही जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

तेली-उगले म्हणाल्या, मतदारांना मतदान करतांना वापरावयाचे पेन, पसंतीक्रमानुसार मतदान करण्याच्या पद्धतीबाबत माहिती देण्यात यावी. सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील समन्वय अधिकाऱ्यांशी संपर्कांत राहून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल, याबाबत दक्षता घ्यावी. मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि मतदान व मतमोजणीसाठी आवश्यक साहित्याची पूर्तता होईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेशी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

निवडणूक विषयक कामकाज करतांना आचारसंहिता विषयक तरतुदींबाबत मार्गदर्शक पुस्तिका तसेच जिल्हा निवडणूक प्रशासन तसेच भारत निवडणूक आयोगाच्या आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरील सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असेही विभागीय आयुक्त म्हणाल्या.

यावेळी नामनिर्देशन पत्र दाखल प्रक्रिया, मतदान व मतमोजणी प्रकिया, मतदार जनजागृती, मनुष्यबळ नियोजन, आचारसंहिता, तक्रारी, माध्यमे व खर्च नियंत्रण, मतदान पूर्वतयारी, वाहतूक आराखडा आदी विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक | NexVarta News