२ ऑक्टोबर, २०२६|Pune: 28°C|Mumbai: 30°C
E-Paper|||
BREAKING
महाराष्ट्र-एसटीमध्ये पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड आवश्यक; कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या नोंदणीकृत प्रवाशांची वैध QR पावतीही ग्राह्य. •महाराष्ट्र -महाराष्ट्रात मालमत्तेसंबंधी ६३ प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आजपासून आधार पडताळणीची अट; आधार नसलेल्यांसाठी नोंदणीचा पुरावा आणि पर्यायी ओळखपत्रांची तरतूद.•देश -फटाक्यांवर पूर्ण बंदी किंवा दिवसभर वापराऐवजी ठरावीक वेळेचा पर्याय विचारात घेण्याची सर्वोच्च न्यायालयाची भूमिका; अंतिम वेळांबाबत निर्णय अद्याप प्रलंबित. •देश-- मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण पूर्ण झालेल्या राज्यांत ऑनलाइन ‘फॉर्म ६’मधील अतिरिक्त SIR घोषणा हटवली; पुनरीक्षण सुरू असलेल्या राज्यांत अट कायम.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे -मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यातील २ ऑक्टोबरचे आंदोलन तात्पुरते स्थगित; परीक्षा ऑफलाइन ठेवण्यासह भरतीबाबत आश्वासने.•पुणे - पुणे जिल्ह्यातील सर्व १२१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ‘मॉडेल पीएचसी’मध्ये रूपांतर करण्याचे नियोजन; ५५ केंद्रांचे रूपांतर पूर्ण, उर्वरित केंद्रांतील सुविधा सुधारण्यावर भर. •विज्ञान - फुलपाखरांच्या पंखांवरील नक्षी आणि हालचालींमुळे उड्डाणाच्या दिशा-वेगाबाबत दृष्टिभ्रम निर्माण होतात; भक्षकांना चकवण्याच्या संभाव्य युक्तीवर ‘नेचर’मध्ये नवे संशोधन. •विज्ञान -आफ्रिकेतील जंगल पुनर्स्थापनेच्या अभ्यासात नैसर्गिक पुनरुत्पादनामुळे प्रकल्पांसह आसपासच्या परिसरातही वृक्षहानी कमी; परिणाम देश आणि पुनर्स्थापनेच्या पद्धतीनुसार बदलत असल्याचा निष्कर्ष. •महाराष्ट्र-एसटीमध्ये पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड आवश्यक; कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या नोंदणीकृत प्रवाशांची वैध QR पावतीही ग्राह्य. •महाराष्ट्र -महाराष्ट्रात मालमत्तेसंबंधी ६३ प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आजपासून आधार पडताळणीची अट; आधार नसलेल्यांसाठी नोंदणीचा पुरावा आणि पर्यायी ओळखपत्रांची तरतूद.•देश -फटाक्यांवर पूर्ण बंदी किंवा दिवसभर वापराऐवजी ठरावीक वेळेचा पर्याय विचारात घेण्याची सर्वोच्च न्यायालयाची भूमिका; अंतिम वेळांबाबत निर्णय अद्याप प्रलंबित. •देश-- मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण पूर्ण झालेल्या राज्यांत ऑनलाइन ‘फॉर्म ६’मधील अतिरिक्त SIR घोषणा हटवली; पुनरीक्षण सुरू असलेल्या राज्यांत अट कायम.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे -मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यातील २ ऑक्टोबरचे आंदोलन तात्पुरते स्थगित; परीक्षा ऑफलाइन ठेवण्यासह भरतीबाबत आश्वासने.•पुणे - पुणे जिल्ह्यातील सर्व १२१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ‘मॉडेल पीएचसी’मध्ये रूपांतर करण्याचे नियोजन; ५५ केंद्रांचे रूपांतर पूर्ण, उर्वरित केंद्रांतील सुविधा सुधारण्यावर भर. •विज्ञान - फुलपाखरांच्या पंखांवरील नक्षी आणि हालचालींमुळे उड्डाणाच्या दिशा-वेगाबाबत दृष्टिभ्रम निर्माण होतात; भक्षकांना चकवण्याच्या संभाव्य युक्तीवर ‘नेचर’मध्ये नवे संशोधन. •विज्ञान -आफ्रिकेतील जंगल पुनर्स्थापनेच्या अभ्यासात नैसर्गिक पुनरुत्पादनामुळे प्रकल्पांसह आसपासच्या परिसरातही वृक्षहानी कमी; परिणाम देश आणि पुनर्स्थापनेच्या पद्धतीनुसार बदलत असल्याचा निष्कर्ष. •
मुख्य पान (Home)महाराष्ट्र वार्तापुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा;उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली*
← सर्व बातम्या पहा
BREAKING• महाराष्ट्र वार्ता

पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा;उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली*

पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा;उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली*
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)

पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संपादनाला विरोध करणारी व विमानतळाची जागा बदलण्याची मागणी करणारी शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयाने दि. २२ सप्टेंबर रोजी फेटाळली.

पुणे, दि. २३ : पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संपादनाला विरोध करणारी व विमानतळाची जागा बदलण्याची मागणी करणारी शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयाने दि. २२ सप्टेंबर रोजी फेटाळली. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदविले आहे की, जागेची निश्चिती करणे हा सर्वस्वी तांत्रिक तज्ज्ञांच्या अखत्यारीतील विषय व शासनाच्या धोरणाचा भाग आहे. राज्याच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी न्यायालय हे तज्ज्ञ प्राधिकरण नाही.

याचिकाकर्ते भूसंपादन किंवा नुकसानभरपाई संदर्भात संबंधित प्राधिकरणांकडे दाद मागू शकतात. तसेच, संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना देण्यात येणारी नुकसानभरपाई योग्य किंवा कायद्यानुसार नसल्यास, त्याविरुद्ध ते आव्हान देऊ शकतात. याचिकाकर्त्याच्या locus standi (दाद मागण्याचा कायदेशीर अधिकार) प्रश्नाचा विचार करता, राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयाला आव्हान देण्यासाठी याचिकाकर्त्यांना आवश्यक कायदेशीर अधिकार (locus) नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

शासनाने निश्चित केलेल्या जागेवरील भूसंपादन प्रक्रिया अतिशय शीघ्र गतीने पूर्ण करण्यात येत असून, वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपुर, मुंजवडी, खानवडी व पारगाव या गावांतील ९६ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे. अद्यापपर्यंत ९१० हेक्टर क्षेत्राच्या संपादनाची कार्यवाही पूर्ण झाली असून, सुमारे ३८७५ कोटी रुपये एवढा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना अदा करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना शीघ्र गतीने लाभ मिळावा म्हणूनच संपादनाची कार्यवाही अतिशय वेगाने करण्यात येत असून, नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने सर्वाधिक दराचे पॅकेज या प्रकल्पाला दिल्यामुळे व पुनर्वसन धोरणामुळे शेतकऱ्यांचे कल्याण साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या वैयक्तिक जमिनीच्या वादांचेही शासनाकडून निराकरण करण्यात येत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या पुनर्वसन धोरणाचा खरा लाभ शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे आणि म्हणूनच स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाढीव मुदत देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत संमती दिली नाही, त्यांना संमती देण्यासाठी २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत स्थानिक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मुदतवाढ देण्यात येत असून, सर्व संपादन प्रक्रिया २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

मात्र, १० ऑक्टोबरनंतर उर्वरित जमिनींसाठी सक्तीने भूसंपादन करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी सक्तीने भूसंपादन होईल, तेथे पुनर्वसन धोरणाचा लाभ देय होणार नाही.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे आवाहन
"पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून खूप मोठे पॅकेज दिले आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की, दिलेल्या वाढीव मुदतीत आपण संमती देणे हे आपल्या हिताचे आहे. संमतीच्या संपादनाने आपणांस १० टक्के परतावा व पुनर्वसन धोरणाप्रमाणे इतर अनुषंगिक लाभ देण्यात येणार आहेत. सामाईक शेतकऱ्यांनी आपापले वैयक्तिक प्रश्न सोडवून नुकसानभरपाईची रक्कम स्वीकारावी, जेणे करून सदर रक्कम न्यायालयीन प्रक्रियेत अडकू नये ."

ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा;उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली* | NexVarta News