२ ऑक्टोबर, २०२६|Pune: 28°C|Mumbai: 30°C
E-Paper|||
BREAKING
महाराष्ट्र-एसटीमध्ये पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड आवश्यक; कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या नोंदणीकृत प्रवाशांची वैध QR पावतीही ग्राह्य. •महाराष्ट्र -महाराष्ट्रात मालमत्तेसंबंधी ६३ प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आजपासून आधार पडताळणीची अट; आधार नसलेल्यांसाठी नोंदणीचा पुरावा आणि पर्यायी ओळखपत्रांची तरतूद.•देश -फटाक्यांवर पूर्ण बंदी किंवा दिवसभर वापराऐवजी ठरावीक वेळेचा पर्याय विचारात घेण्याची सर्वोच्च न्यायालयाची भूमिका; अंतिम वेळांबाबत निर्णय अद्याप प्रलंबित. •देश-- मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण पूर्ण झालेल्या राज्यांत ऑनलाइन ‘फॉर्म ६’मधील अतिरिक्त SIR घोषणा हटवली; पुनरीक्षण सुरू असलेल्या राज्यांत अट कायम.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे -मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यातील २ ऑक्टोबरचे आंदोलन तात्पुरते स्थगित; परीक्षा ऑफलाइन ठेवण्यासह भरतीबाबत आश्वासने.•पुणे - पुणे जिल्ह्यातील सर्व १२१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ‘मॉडेल पीएचसी’मध्ये रूपांतर करण्याचे नियोजन; ५५ केंद्रांचे रूपांतर पूर्ण, उर्वरित केंद्रांतील सुविधा सुधारण्यावर भर. •विज्ञान - फुलपाखरांच्या पंखांवरील नक्षी आणि हालचालींमुळे उड्डाणाच्या दिशा-वेगाबाबत दृष्टिभ्रम निर्माण होतात; भक्षकांना चकवण्याच्या संभाव्य युक्तीवर ‘नेचर’मध्ये नवे संशोधन. •विज्ञान -आफ्रिकेतील जंगल पुनर्स्थापनेच्या अभ्यासात नैसर्गिक पुनरुत्पादनामुळे प्रकल्पांसह आसपासच्या परिसरातही वृक्षहानी कमी; परिणाम देश आणि पुनर्स्थापनेच्या पद्धतीनुसार बदलत असल्याचा निष्कर्ष. •महाराष्ट्र-एसटीमध्ये पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड आवश्यक; कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या नोंदणीकृत प्रवाशांची वैध QR पावतीही ग्राह्य. •महाराष्ट्र -महाराष्ट्रात मालमत्तेसंबंधी ६३ प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आजपासून आधार पडताळणीची अट; आधार नसलेल्यांसाठी नोंदणीचा पुरावा आणि पर्यायी ओळखपत्रांची तरतूद.•देश -फटाक्यांवर पूर्ण बंदी किंवा दिवसभर वापराऐवजी ठरावीक वेळेचा पर्याय विचारात घेण्याची सर्वोच्च न्यायालयाची भूमिका; अंतिम वेळांबाबत निर्णय अद्याप प्रलंबित. •देश-- मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण पूर्ण झालेल्या राज्यांत ऑनलाइन ‘फॉर्म ६’मधील अतिरिक्त SIR घोषणा हटवली; पुनरीक्षण सुरू असलेल्या राज्यांत अट कायम.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे -मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यातील २ ऑक्टोबरचे आंदोलन तात्पुरते स्थगित; परीक्षा ऑफलाइन ठेवण्यासह भरतीबाबत आश्वासने.•पुणे - पुणे जिल्ह्यातील सर्व १२१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ‘मॉडेल पीएचसी’मध्ये रूपांतर करण्याचे नियोजन; ५५ केंद्रांचे रूपांतर पूर्ण, उर्वरित केंद्रांतील सुविधा सुधारण्यावर भर. •विज्ञान - फुलपाखरांच्या पंखांवरील नक्षी आणि हालचालींमुळे उड्डाणाच्या दिशा-वेगाबाबत दृष्टिभ्रम निर्माण होतात; भक्षकांना चकवण्याच्या संभाव्य युक्तीवर ‘नेचर’मध्ये नवे संशोधन. •विज्ञान -आफ्रिकेतील जंगल पुनर्स्थापनेच्या अभ्यासात नैसर्गिक पुनरुत्पादनामुळे प्रकल्पांसह आसपासच्या परिसरातही वृक्षहानी कमी; परिणाम देश आणि पुनर्स्थापनेच्या पद्धतीनुसार बदलत असल्याचा निष्कर्ष. •
मुख्य पान (Home)महाराष्ट्र वार्तासोलापूर विभागात स्वच्छ स्थानके व गाड्या, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्ती, वारसा संवर्धन आणि सफाई मित्र कल्याणासाठी विविध उपक्रम.
← सर्व बातम्या पहा
TRANSPORT• महाराष्ट्र वार्ता

सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके व गाड्या, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्ती, वारसा संवर्धन आणि सफाई मित्र कल्याणासाठी विविध उपक्रम.

सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके व गाड्या, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्ती, वारसा संवर्धन आणि सफाई मित्र कल्याणासाठी विविध उपक्रम.
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)

या अभियानाचा एक भाग म्हणून मध्य रेल्वे महिला कल्याण संघटना (CRWWO), सोलापूर विभाग यांच्या वतीने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ‘स्वच्छ आणि सुंदर उद्यान’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण ८३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून स्वच्छता, हरित पर्यावरण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

सोलापूर, NVnews-सोलापूर विभाग, मध्य रेल्वेतर्फे ‘स्वच्छता ही सेवा (SHS) २०२६’ अभियानांतर्गत स्थानके, रेल्वेगाड्या, रेल्वे वसाहती आणि कार्यालयांमध्ये स्वच्छता, पर्यावरणविषयक जनजागृती, लोकसहभाग तसेच कर्मचाऱ्यांच्या कल्याणाशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या अभियानाचा एक भाग म्हणून मध्य रेल्वे महिला कल्याण संघटना (CRWWO), सोलापूर विभाग यांच्या वतीने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ‘स्वच्छ आणि सुंदर उद्यान’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण ८३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून स्वच्छता, हरित पर्यावरण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

बातमी फोटो

स्वच्छ स्थानके आणि स्वच्छ रेलगाडी

सोलापूर, कलबुरगि, वाडी, अक्कलकोट आणि पाकणी यांसह प्रमुख तसेच इतर स्थानकांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान स्वच्छता उपकरणे व साधने, वैयक्तिक सुरक्षा साधने (PPE), ओला-सुका कचरा वर्गीकरण आणि कचरापेट्यांची उपलब्धता यावर विशेष भर देण्यात आला. ‘स्वच्छ रेलगाडी’ उपक्रमांतर्गत लातूर आणि पंढरपूर येथील निवडक रेल्वेगाड्यांची पाहणी करून स्वच्छता करण्यात आली. यामध्ये शौचालये, डब्यांचे आतील व बाहेरील भाग, लिनेन, पॅन्ट्री कार तसेच OBHS व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. विविध ठिकाणी नाले आणि शौचालयांचीही स्वच्छता करण्यात आली.

चार प्रकारच्या कचरा वर्गीकरणासह घरगुती कंपोस्टिंगला प्रोत्साहन

गणेश हॉल आणि शनी मंदिर रेल्वे वसाहती तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) कार्यालयातील कार्मिक शाखेत चार प्रकारच्या कचरा वर्गीकरणाबाबत आणि घरगुती कंपोस्टिंगबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. रेल्वे वसाहतीतील रहिवासी आणि कर्मचाऱ्यांना कचऱ्याचे उगमस्थानीच वर्गीकरण करण्यास तसेच घरगुती कंपोस्टिंगचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. ‘जन भागीदारी’ जनजागृती कार्यक्रम सोलापूर, वाडी, कलबुरगि आणि पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन (SWM) नियम २०२६, चार प्रकारचे कचरा वर्गीकरण, घरगुती कंपोस्टिंग आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करणे या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सोलापूर आणि वाडी स्थानकांवर कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. डॉ. कोटणीस स्मारक रेल्वे रुग्णालयात घरगुती कंपोस्टिंगबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. तसेच सोलापूर येथील नवीन कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा सुमारे ५० रेल्वे कर्मचाऱ्यांना लाभ झाला.

क्रीडा आणि वारसा संवर्धन

सोलापूर येथील रेल्वे क्रीडा मैदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात क्रिकेट आणि व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून क्रीडाभावनेसोबतच स्वच्छता आणि जबाबदार कचरा व्यवस्थापनाचा संदेश देण्यात आला. पंढरपूर रेल्वे स्थानक, DRM कार्यालय आणि सोलापूर रेल्वे स्थानक येथील वारसास्थळांवर स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या. या उपक्रमांमुळे रेल्वेच्या ऐतिहासिक वारशाची देखभाल आणि जतन करण्यास हातभार लागला.

‘कबाड से जुगाड’मधून सर्जनशीलतेचे दर्शन

सोलापूर विभागात ‘कबाड से जुगाड / कबाड से कला’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत SPARMV/SUR कोअर ग्रुप टीमने रेल्वेच्या भंगार साहित्यापासून पूर्णपणे हस्तनिर्मित केलेले वाफेच्या इंजिनाचे विंटेज मॉडेल सादर केले. या उपक्रमातून सर्जनशीलता, कौशल्य आणि ‘कचऱ्यापासून संपत्ती निर्मिती’ (Waste-to-Wealth) या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय रेल्वेच्या गौरवशाली वारशालाही उजाळा देण्यात आला.

सफाई मित्र सुरक्षा शिबिर

सोलापूर येथील विभागीय रेल्वे रुग्णालय आणि वाडी आरोग्य केंद्र येथे ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ आयोजित करण्यात आले. या शिबिरांत सफाई मित्रांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सोलापूर, कलबुरगि आणि इतर ठिकाणी रेल्वे डब्यांची स्वच्छता, बायो-टॉयलेटची स्वच्छता आणि कीटकनियंत्रणाच्या कामात कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क, हातमोजे आणि हँड सॅनिटायझर वितरित करण्यात आले.

या सर्व उपक्रमांमधून सोलापूर विभागाची स्वच्छ स्थानके व रेल्वेगाड्या, जबाबदार कचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय शाश्वतता, रेल्वे वारशाचे संवर्धन तसेच सफाई मित्रांच्या आरोग्य व सुरक्षिततेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित होते. रेल्वे कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, विद्यार्थी, मुले, प्रवासी, रेल्वे वसाहतीतील रहिवासी, CRWWO, वैद्यकीय विभाग तसेच पर्यावरण व गृहव्यवस्थापन (EnHM) पथक यांच्या सक्रिय सहभागातून ‘जन भागीदारी’ आणि स्वच्छतेची भावना संपूर्ण विभागात अधिक दृढ होत आहे.

ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके व गाड्या, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्ती, वारसा संवर्धन आणि सफाई मित्र कल्याणासाठी विविध उपक्रम. | NexVarta News