वाशिममध्ये ठाकरे शिवसेना समृद्धी महामार्ग बंद करण्याचा इशारा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन
वाशिममध्ये ठाकरे शिवसेना समृद्धी महामार्ग बंद करणार, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन.
वाशिम, NVnews-आज वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार येथे ठाकरेंची शिवसेना समृद्धी महामार्ग बंद करणार असल्याचा इशारा दिला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने १ लाखांची मदत न दिल्याच्या निषेधार्थ विदर्भातील शेतकऱ्यांना सोबत घेत ठाकरसेनेचे हे आंदोलन होत आहे.
राज्य सरकारने ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. ५,००० रुपयांची आगाऊ मदत अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
समृद्धी महामार्ग हा राज्यातील महत्त्वाचा द्रुतगती मार्ग असून, त्याच्या बंदमुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
शेतकरी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारने तातडीने भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

