४ नोव्हेंबर, २०२६|Pune: 28°C|Mumbai: 30°C
E-Paper|||
BREAKING
देश - PM किसानची २४ वी हप्ता आज जारी होणार, ९.३४ कोटी शेतकऱ्यांना २,००० रुपये मिळणार.•देश- सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटल अटक पीडितांना भरपाई देण्याचे निर्देश.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - पुण्यात उद्योग दिंडी एक्स्पो २०२६ आजपासून सुरू.•पुणे- पुणे मनपाकडून पाण्याच्या नासाडीवर होणार १०,००० रूपयांचा दंड.•महाराष्ट्र - वाशिममध्ये ठाकरे शिवसेना कडून समृद्धी महामार्ग बंद करण्याचा इशारा.•पुणे - पुण्यात बंद फ्लॅटमध्ये आढळला ३४ वर्षीय युवतीचा मृतदेह.•महाराष्ट्र - नवी मुंबईतील तळोजा येथे ३०-३१ ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद.•देश - PM किसानची २४ वी हप्ता आज जारी होणार, ९.३४ कोटी शेतकऱ्यांना २,००० रुपये मिळणार.•देश- सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटल अटक पीडितांना भरपाई देण्याचे निर्देश.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - पुण्यात उद्योग दिंडी एक्स्पो २०२६ आजपासून सुरू.•पुणे- पुणे मनपाकडून पाण्याच्या नासाडीवर होणार १०,००० रूपयांचा दंड.•महाराष्ट्र - वाशिममध्ये ठाकरे शिवसेना कडून समृद्धी महामार्ग बंद करण्याचा इशारा.•पुणे - पुण्यात बंद फ्लॅटमध्ये आढळला ३४ वर्षीय युवतीचा मृतदेह.•महाराष्ट्र - नवी मुंबईतील तळोजा येथे ३०-३१ ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद.•
मुख्य पान (Home)महाराष्ट्र वार्तादुष्काळग्रस्तांसाठी आमदार जगतापांचा मदतीचा हात.
← सर्व बातम्या पहा
CM FUND• महाराष्ट्र वार्ता

दुष्काळग्रस्तांसाठी आमदार जगतापांचा मदतीचा हात.

दुष्काळग्रस्तांसाठी आमदार जगतापांचा मदतीचा हात.
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे ११ लाखांची मदत सुपूर्द.

पुणे,29 ऑक्टोबर, NVnews-पावसाने अचानक दडी मारल्याने निर्माण झालेली दुष्काळ परिस्थिती, शेतीचे नुकसान आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या वतीने विजुशेठ जगताप आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि संकटाच्या काळात त्यांना आधार मिळावा, या उद्देशाने जगताप यांच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे ११ लाख रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मदतीचा धनादेश देण्यात आला.

शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी दुष्काळ हा केवळ पाण्याचा प्रश्न राहत नाही, तर तो त्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न बनतो. पिकांची हानी, घटते उत्पन्न आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे शेतकरी कुटुंबांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदतीचा हात देण्याची गरज असते. याच सामाजिक जाणिवेतून आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचे योगदान दिले. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी सक्षम असेल, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ मिळते. त्यामुळे संकटाच्या काळात शेतकऱ्यांना केवळ सहानुभूती न दाखवता प्रत्यक्ष मदत मिळणे महत्त्वाचे आहे. दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना हातभार लागावा, या हेतूने ही रक्कम देण्यात आली आहे. यावेळी ऍड. सखाराम कोळसे पाटील, निलेश पवार, प्रवीण जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे दुष्काळग्रस्तांसाठी काम सुरू राहणार...

आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक होतकरू कुटुंबियांना शैक्षणिक, आरोग्य विषयक कारणांसाठी आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या माध्यमातून नेहमीच नागरिकांसाठी मदतकार्य सुरू असते. मात्र, यंदा संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आमदार जगताप यांच्याकडून दुष्काळग्रस्तांसाठी निरंतन काम सुरू राहणार आहे.

शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, दुष्काळासारख्या संकटामुळे शेतकरी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आपण एकटे नाही, तर संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे, याची जाणीव होणे आवश्यक आहे. याच भावनेतून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे ११ लाख रुपयांची मदत सुपूर्द केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे.
  • शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा.
  • ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
    दुष्काळग्रस्तांसाठी आमदार जगतापांचा मदतीचा हात. | NexVarta News