पुण्यात उद्योग दिंडी एक्स्पो २०२६ आजपासून सुरू, महापौरांच्या हस्ते उद्घाटन.
पुण्यात उद्योग दिंडी एक्स्पो २०२६ आजपासून सुरू, महापौरांच्या हस्ते उद्घाटन.
पुणे,30 ऑक्टोबर, NVnews-मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी आणि व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट'च्या पुणे विभागातर्फे 'उद्योग दिंडी एक्स्पो २०२६'चे आयोजन करण्यात आले आहे. ३० ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या तीन दिवसांत कर्वेनगर येथील डी. पी. रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्समध्ये हा एक्स्पो होणार आहे.
एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी दहाला महापौर मंजूषा नागपुरे यांच्या हस्ते होईल. एक्स्पोमधील 'रिडेव्हलपमेंट लाऊंज'मध्ये जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत सविस्तर मार्गदर्शन आणि मोफत सल्ला मिळणार आहे.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त डॉ. अजित मराठे, विश्वस्त मंडळ आणि सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली एक्स्पोचे आयोजन केले आहे. या एक्स्पोमध्ये ६० हून अधिक तंत्रज्ञान आणि OEM प्रदर्शक, २०० हून अधिक परिषद प्रतिनिधी आणि दोन दिवसांत २,००० हून अधिक अभ्यागत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
'फॅक्टरी ऑफ द फ्युचर फॉर नेक्स्ट-जेन मोबिलिटी' या संकल्पनेअंतर्गत परिषदेत विद्युतीकरण, ऑटोमेशन, सायबर सुरक्षा आणि परिपत्रक उत्पादन यावर चर्चा होणार आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

